ही कार्यशाळा दिनांक ६ फेब्रुवारी २००९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आली. कार्यशाळेचे उद्‍घाटन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्या शुभहस्ते झाले. प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचच्या संयोजक डॉ. कुमुद बन्सल यांनी केले. महाराष्ट्राच्या शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव श्री. संजय कुमार हे कार्यशाळेच्या उद्‍घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. जयराज फाटक, आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान भूषविले.

कार्यशाळेचे आयोजन :

कार्यशाळेचे आयोजन :

अशा अनेक गोष्टींमुळे शहरी भागातील शिक्षणाचे प्रश्न ग्रामीण भागातील शिक्षणापेक्षा वेगळे होतात. पण राज्यस्तरावरील शैक्षणिक धोरणे सर्वसाधारणपणे ग्रामीण भाग डोळ्यांसमोर ठेवून आखली जातात. ते स्वाभाविकही आहे. शहरी भागाच्या गरजांचा त्यात वेगळा विचार केलेला असतो. या पुढच्या काळात शहरी भागातील शैक्षणिक समस्यांचा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा वेगळा विचार करावा लागेल. हे सर्व लक्षात घेऊनच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने नागरी भागातील शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रमावर दिनांक ६ फेब्रुवारी २००९ रोजी मुंबई येथे एक कार्यशाळा आयोजित केली.

सुविधा याबाबतीत कमालीची विषमता आढळून येते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शाळांकडे उपलब्ध असलेल्या सुविधा आणि शिक्षकांची शैक्षणिक अर्हता या बाबतीत शहरी भागातील परिस्थिती बरीच चांगली असली तरी महानगरपालिकांच्या बहुसंख्य शाळांचा दर्जा, तसेच महानगरपालिका क्षेत्रातील अनेक खाजगी शाळांचा दर्जा ग्रामीण भागातील अनेक शाळांपेक्षा कमी असल्याचे दिसून येते. ग्रामीण शहरी भागातही विद्यार्थ्यांच्या प्राथमिक आणि विशेषतः उच्च प्राथमिक स्तरावरील गळतीचे प्रमाण बरेच जास्त आहे. शहरी भागातील झोपडपट्ट्या, खेळांसाठी मैदानांचा अभाव, वाहतुकीच्या समस्या अशा खास शहरीकरणाच्या समस्यांचाच वेगळा विचार करावा लागतो.

Photo Gallery
Photo Gallery