उत्तर पवारसाहेबांनी गेल्या चाळीस वर्षांत येथील प्रत्येकाशी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. येथील मतदारांचा मान राखण्याचे काम साहेबांनी केले. मतदारांनीही त्यांना मोठ्या मताधिक्‍याने येथून दर वेळी निवडून दिले. त्यामुळे या मतदारसंघाचे वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मताधिक्‍यापेक्षा मतदारांशी विश्वासाचे नाते जपण्याला मी अधिक महत्त्व देते.

प्रश्न तुम्ही बारामती मतदारसंघात मताधिक्‍याचा विक्रम करणार, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत...

उत्तर घराणेशाहीविषयी काही मंडळींचे आक्षेप योग्यही असतील. मात्र याची दुसरी बाजूही समजावून घेतली पाहिजे. घराण्याच्या पूर्वपुण्याईवर मला एकदाच निवडणूक जिंकता येईल. पुढची वाटचाल स्वकर्तृत्वावरच करावी लागणार असल्याची मला जाणीव आहे. या मतदारसंघातून मला पक्षाने संधी दिली. पवारसाहेबांचा हा मतदारसंघ आहे. साहेब आमच्या पक्षाचेच नव्हे, तर देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. या मतदारसंघात साहेबांनी विकासाचे जे स्वप्न पाहिले, ते बरेचसे पूर्ण होत आले आहे. अजून शिल्लक असलेली कामे पूर्ण करण्यावर माझा भर असणार आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम अत्यंत जबाबदारीने करीत राहणे म्हणजे राजकारण, अशी माझी व्याख्या आहे. त्याच दृष्टीने माझी वाटचाल असेल.

उत्तर माझी पहिलीच निवडणूक असल्याने मी ती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. मी कोणतीही गोष्ट गृहीत धरलेली नाही. मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत जाण्यासाठी तीन महिन्यांपासूनच मी दौरा सुरू केला आहे. मतदारसंघातील ९६० पैकी ७५० गावांमध्ये मी आतापर्यंत जाऊन आले आहे. साडे-पंधरा लाख मतदार आणि अठरा वर्षांच्या आतील सुमारे दहा लाख लोकसंख्या, यातल्या प्रत्येकापर्यंत पोचण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण, पुढे जाऊन मला या पंचवीस लाख लोकांचे प्रतिनिधित्व करायचे आहे. यातील प्रत्येकाला मी ओळखत नाही. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचे झे नियोजन आहे.

मतदारांचा विश्‍वास राखण्याला प्राधान्य - सुळे

प्रश्न मतदारसंघातील आतापर्यंतच्या प्रचारसभांना कसा प्रतिसाद मिळाला आहे?

प्रश्न तुमचा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे काही मंडळी घराणेशाहीचाही आरोप करीत आहेत. याविषयी तुमचे मत काय आहे?

1 /4

Interview

Interview

Photo Gallery
Photo Gallery

Back