NEWS

माझी दृष्टी आणि ध्येय:


माझी दृष्टी:-

आपल्या समाजाच्या जात-धर्म, वर्ग, लिंग याभेदांपासून मुक्त अशा शक्तीशाली, समृद्ध आणि सातत्यपूर्ण समाजाकडे प्रवास व्हावा, या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत.

 

माझे ध्येय:-

माझ्या जनतेसाठी, विशेषतः समाजील सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी, त्यांच्या भल्यासाठी सातत्याने झटणे हे माझा ध्येय आहे. भारतीय नागरिकांना त्यांच्या क्षमतांची पूर्ण जाणीव करून देणे आणि त्या वाढवणे आणि त्यायोगे भारताला एक समृद्ध देश आणि जगज्जेता बनवणे हेच जनतेची प्रतिनिधी म्हणून माझे ध्येय आहे. मला खात्री आहे, आपण सगळे एकत्र मिळून हे ध्येय नक्की गाठू शकू. आणि याहूनही अधिक काही साध्य करू शकू.

 

पाय जमिनीवर... नजर क्षितीजावर


पाणी

शेतीसाठी पाणी- महत्वाचे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित  होऊन अधिकाधिक जमिन बागायती शेतीखाली आणणे. त्याचबरोबर पावसाचे पाणी अडवण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेणे.
पिण्याचे पाणी- शुद्ध व मुबलक पाण्यासाठी स्त्रोत निर्मळ रहावेत तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प उभे रहावेत म्हणून प्रयत्न.


आधुनिक शेती

शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणे, चांगली बियाणे आणि खते यांच्या नियमित पुरवठ्याची खात्री करणे.
ज्ञान आणि तंत्रज्ञानाची शेतीसोबत सांगड घालून ज्ञानाधारीत शेती (Knowledge Based Agriculture) विकसित व्हावी तसेच शेतीमालाची गुणवत्ता सुधारून निर्यातीमध्ये वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणे.
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा, ऊसाच्या दरासाठी स्वतंत्र मंडळ लवकरात लवकर स्थापन व्हावे आणि त्यांचे काम प्रभावी व्हावे याकरीता प्रयत्नशील राहणे.

पायाभूत सुविधाः-

मतदार संघात चांगल्या रस्त्यांचे जाळे उभे रहावे तसेच पुणे शहरात रिंग रोड व मेट्रो रेल साठी पाठपुरावा करणे.
योग्य दाबाची वीज जास्तीत जास्त वेळ उपलब्ध व्हावी यासाठी संबंधीत विभागांसोबत पाठपुरावा करणे.
रेल्वेंची संख्या वाढावी तसेच नवीन रेल्वे मार्ग जोडले जावेत याकारीता केंद्र शासनासोबत पाठपुरावा करणे.


वंचित घटकांना न्याय

समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा तसेच विकासाच्या सर्व प्रक्रियांत त्यांचा वाटा मिळवून देण्यासाठी आघाडीवर राहणे.

शिक्षण

शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण यांची गुणवत्ता वाढवणे आणि त्यासोबतच करीयर विषयी मार्गदर्शन व आधुनिक शिक्षणाच्या संधी मतदारसंघातील विद्यार्थ्यांना मिळवून देणे.

रोजगार

युवक व युवतींना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात याकरीता औद्योगीक व सेवाक्षेत्रांचा विकास करणे.


आरोग्य

विभागातील प्रत्येक गरजू व्यक्तीला आरोग्याची सुविधा चांगल्या दर्जाची व वेळेत मिळेल याची खात्री करणे.

महिला सक्षमीकरण

महिला व युवतींची सुरक्षेसाठी प्रयत्न, बचतगटांना प्रोत्साहन आणि राजकीय-सामाजिक प्रक्रीयेत सहभाग तसेच मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणे.

ज्येष्ठ नागरीक व अपंग

ज्येष्ठ नागरीकांना सन्मानपूर्ण वागणूक आणि विरंगुळा केंद्रे तसेच अपंगांच्या सर्वांगिण पुनर्वसनासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न.

सुशासन

शासन-प्रशासन यंत्रणेचा कारभार पारदर्शी रहावा तसेच नागरीकांच्या प्रश्नांची योग्य वेळेत सोडवणूकीसाठी व्यवस्था सक्षम करणे. कार्यालयामध्ये एक टेलिफोन हेल्पलाईन सुरु करुन जनतेसोबत संपर्कात राहणे आणि त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे.