NEWS

आपलं नेतृत्व

 

phoca_thumb_l_supriya086.jpg - 44.31 KB

मा. शरद पवार साहेबांनी मा. यशवंतराव चव्हाण ह्यांच्याकडून समाजकारणातून राजकारणाचे धडे शिकून राजकारणात  प्रवेश केला. १९६७ सालात पहिली आमदारकीची निवडणूक लढवून ते निवडून आले आणि आज केंद्रीय स्तरावर एक अतिशय हुशार आणि लोकप्रिय नेता म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी निर्माण केलेले आहे.


एक विद्यार्थी नेता म्हणून मा. शरद पवार साहेब महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर कार्यरत होते.ह्या प्रक्रियेत त्यांचा युवक कॉंग्रेसशी संबंध आला व त्यांनी राजकारणात प्रवेश केला.


आपल्या राजकीय कारकीर्दीत निव्वळ राजकारणच नव्हे तर शिवाय साहित्य, अन्य कला, क्रीडा, समाजसेवा, उद्योग, पत्रकारिता आदी क्षेत्रांतील दिग्गजांशी, मान्यवरांशी, अभ्यासकांशी त्यांचा जवळून संबंध आला. ह्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांनी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले.


अवघ्या २६-२७ व्या वर्षी मा. पवार साहेब आमदार झाले. १९७४ मध्ये ते मंत्री झाले, आणि १९७८ मध्ये वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. १९७८, १९८८ , १९९०, १९९३  असे चार वेळा त्यांनी विविध कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद सांभाळले. दरम्यान केंद्रीय संरक्षण खात्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. २००९-२०१४ सालात त्यांनी भारताचे कृषीमंत्रीपद भूषविले.


मा. पवार साहेबांचीशेतकऱ्यांच्या नेता म्हणून एक वेगळी ओळखही आहे. ते महाराष्ट्राबरोबर देशाच्या शेतकऱ्यांचेदेखील फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहेत. भारतीय शेती जागतिक स्तरावर जाऊन एक महत्वाचा स्पर्धक व्हावी हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, मग ते जैवतंत्रज्ञान असो की माहिती तंत्रज्ञान, त्याचा पवार करण्यास ते कायमच प्राधान्य देत आले आहेत. केवळ फलोद्यानच नाही तर कुकुटपालनातही महाराष्ट्र राज्याचे नव व्हावे ह्यासाठी विविध कंपन्यांना त्यांनी प्रोत्साहित केले आहे. अनेक रोगांपासून पशूंचे संरक्षण व्हावे ह्यासाठी जागृती निर्माण करण्यावर भर दिलं.महाराष्ट्रात जलस्वराज्य आणि आर्थिक स्वयंपूर्णता आणण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले आहेत.


माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनात वाढ, फळबाग विकास योजना, महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा विकास, साखर कारखाने क्षेत्रातील योगदान, मुंबईतील दंगली-किल्लारी भूकंप या संकटांनंतर हाताळलेली परिस्थिती, महिला आरक्षण विषयातील भूमिका व निर्णय, माहिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे धोरण, राज्यातील वंचित घटकांसाठीचे त्यांचे धोरण ह्या सर्व धोरणांचे श्रेय मा. पवार साहेबांनाचेच आहे. ह्या सर्वांबरोबरच महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५०% आरक्षण मिळण्यासाठी मा. पवार साहेबांनीच पुढाकार घेतला होता. अन्न सुरक्षा विधेयक पारित करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.


मा. पवार साहेबांचा आतापार्यांचा राजकीय प्रवास हा विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या धोरणी आणि पुरोगामी राजकीय शैली यामुळेच त्यांना “जाणता राजा” म्हणून संबोधले जाते.