NEWS

आपला पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राजकारणाच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्यास मदत करणारा मंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब नेहमीच ८०% समाजकारण आणि २०% राजकारण ह्या मा. यशवंतराव चव्हाण ह्यांच्या शिकवणीप्रमाणे वागत आले आहेत. त्याच शिकवणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिलेला आहे.  

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस मागिल तेरा वर्षांमध्ये दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळकला जातो. केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचेच निर्णय घेतले जातील आणि त्यांची अंमलबजावणी होईल याकरीता आपला पक्ष सदैव प्रयत्नशील राहिला आहे. सत्ता ही समाजाच्या भल्यासाठी वापरावी, सामान्य जनतेला सत्तेचा आधार वाटावा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे.

 

धर्मनिरपक्षतेच्या मूल्यांना धरून लोकशाहीच्या मार्गावर आपला पक्ष सर्वांना विकासाच्या दिशेने घेऊन जात आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देणे आणि सामाजिक समतेसाठी फुले-शाहू आंबेडकरांनी घालून दिलेल्या मार्गाने आपण गेली चौदा वर्षे वाटचाल करीत आहोत

 

१९९९ मध्ये पक्ष स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राच्या विकासात पक्षाचा खूप मोठा हातभार आहे. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राबवविलेल्या योजनांचा लाभ राज्यातील सर्व लोकांना झालेला आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शिक्षणाच्या आणि रोजगार क्षेत्रात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. जनतेला शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात स्वायत्तता देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून सतत केला जातो. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात देशाच्या प्रगतीचे धेय्य ठेवून पक्षाचे कार्यकर्ते सतत काम करत असतात.

 

मा. शरद पवार साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे. दुसऱ्याच्या शेतात राबणाऱ्या अनेक शेतमजुरांना, दलित समाजातील, भटक्या आणि विमुक्त जमातीतील आणि इतर दलित शेतमजुरांसाठी अनेक लोकांना सक्षम बनविण्यासाठी अनेक खास योजना मा. पवार साहेबांनी लागू केल्या आहेत. अल्पसंख्यांकासाठी सच्चर कमिटीच्या प्रस्तावांचे स्वागत करण्यात लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रेसर होता.

 

राष्ट्रवादी पक्षाची खरी ताकद जर कोणती असेल तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत आणि वाडी वस्तीपर्यंत कार्यरत असलेले पक्षाचे कार्यकर्ते. आपल्या लोकांशी सतत संपर्कात असणारे, त्यांच्या सुःख दुःखात त्यांना साथ देणारे, अडिअडचणीला धवपळ करणे मदत करणारे अशीच आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांबाबत लोकांच्या मनात भावना आहे. आणि याच जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सर्वाधिक जागांवर आपला पक्ष निवडून येतो आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची एक कार्यकर्ती आणि लोकांकडून निवडून आलेली मी लोकप्रतिनिधी आहे याचा मला अभिमान आहे.