NEWS

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस

 

आज भारतातील युवती आणि महिला खेळ, लष्कर, सायन्स, तंत्रज्ञान आणि इतरही सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करीत आहेत. आज अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुख म्हणून महिला कार्यरत आहेत. राष्ट्रपतीपद, पंतप्रधानपद, लोकसभेच्या सभापतीपद, विरोधी पक्षनेतेपद महिलांनी भूषवले आहे. आपण पाहत आहोत की देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री या महिला आहेत. तरीही सामान्य घरातील युवती सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करायला फारशा उत्सुक नसतात. युवतींनी राजकीय प्रक्रियेत यावे याकरीता त्यांना आश्वासक वातावरण, नेतृत्वाची संधी, आपले म्हणणे मांडण्याकरीता व्यासपिठ आवश्यक असते. हेच वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचा विचार पुढे आला.

 युवतींसाठी स्वतंत्र राजकीय मंच.. फक्त राष्ट्रवादीमध्येच

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेहमी युवती व महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिला आहे याबाबत निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आघाडीवर राहिला आहे.

आदरणीय पवार साहेबांच्या पुढाकारामुळेच महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम महिला धोरण जाहीर केले आणि राज्य महिला आयोगाची स्थापना केली. ते केंद्रात संरक्षण मंत्री असतानाच  महिलांना सशस्त्र सैन्यदलात भरती होण्याची संधी मिळाली. महिलांना पंचायती राज संस्थांमध्ये आधी 33 आणि नंतर 50 आरक्षण देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेच पुढाकार घेतला.

मा. सुप्रियाताई सुळे यासुद्धा महिला व युवती सक्षमीकरणासाठी यशस्विनी सामाजिक अभियान (बचत गटांची चळवळ),जागर हा जाणीवांचा (स्त्रीभ्रूण हत्या विरोधी अभियान), युवती मेळावे, किशोरी मेळावे असे अनेक उपक्रम राबवीत आहेत. राज्याने आपले पहिले युवा धोरण जाहीर करावे यासाठी मा. सुप्रियाताईंनीच पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आणि सरकारमधिल विविध मंत्र्यांनी महिला  आणि युवतींच्या सक्षमिकरणासाठी सदैव प्रयत्न केले आहेत. महिलांना व युवतींना त्यांच्या हक्काची सत्तापदे देण्यातदेखील साष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सतत पुढे राहिला आहे. नुकत्याच झालेल्या पंचायती राज संस्थांच्या निवडणूकांत या पक्षाला सर्वात जास्त जगा तर मिळाल्या आहेतपण निवडून आलेल्या महिलांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिलांची संख्या इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त आहे.

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची स्थापना

ह्या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मा. सुप्रिया सुळे नेतृत्वाखाली युवती कॉंग्रेसची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या काळात युवतींमध्ये सक्षम आणि कर्तबगार नेतृत्व विकास करण्यासाठी युवती काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

१० जून २०१२ म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिवशी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली. युवती काँग्रेसची निर्मिती पुढील काही गोष्टींचा विचार करून करण्यात आलेली आहे.

तरुण मुलींना जबाबदार नेता बनण्यासाठी आवश्यक मंच उपलब्ध करून देणे. ह्या मंचाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमातून नेतृत्वाची संधी, आपले सामाजिक आणि राजकीय संबंध स्थापन करण्याची संधी, आणि विविध राजकीय धोरणांमध्ये सहभाग घेता यावा.

राष्ट्रवादी युवती मेळावे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युवती काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यभर ५० युवती मेळावे घेतले. ह्या मेळाव्यातून पक्षाचा जवळपास २ लाख युवतींशी संपर्क आला. या मेळाव्यांमध्ये अनेक युवतींनी आपले म्हणणे मांडले. युवतींचे अनेक प्रश्नही पक्षाच्या समोर आले. मान्यवर व मंत्र्यांनी युवतींच्या प्रश्नांची उत्तरे दिली. अनेक बाबतीत मेळाव्यांमध्येच पुढील कार्यवाहीची दिशा स्पष्ट होत गेली. प्रत्येक मेळाव्यामधून युवती नविन उमेद घेऊन जात होत्या.( युवती मेळाव्यांच्या यादीकरीता येथे क्लिक करा )

प्रशिक्षण शिबिरे-

समाजकारण आणि राजकरणातील नेतृत्व प्रत्यक्ष कामातून घडते. परंतु त्याबरोबरच नियमित प्रशिक्षणाची देखील गरज असते.युवतींमध्ये सक्षम नेतृत्व घडावे म्हणून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस तर्फे नियमित प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात.

सनद

युवतींचा विकास आणि त्यांचे हक्क याबाबतच्या राष्ट्रवादीच्या बांधिलकीतूनच युवतींसाठीची ही सनद सादर करण्यात आली आहे. या सनदेमधील समाज प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस सदैव प्रयत्नशील आहे..

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस सनद डाऊनलोड करण्यासाठी मुखपृष्ठावर क्लिक करा


सुरक्षा 

·         छेडछाडीपासून मुक्त वातावरण- कठोर कायदे

·         स्वसंरक्षणासाठी शारिरीक प्रशिक्षण

·         घरगुती हिंसाचारापासून मुक्ती

आरोग्य-  

·         स्त्रीभ्रूणहत्येस प्रतिबंध

·         अशक्तपणा- हिमोग्लोबीनची तपासणीउपाय

·         मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शन

शिक्षण- 

·         युवतींकरीता वसतीगृह

·         कॉलेजफीमध्ये सवलत- विनातारण शैक्षणिक कर्ज

·         सुरक्षित कॉलेज

रोजगार-

·         रोजगार- स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र

·         स्वयंरोजगारासाठी% व्याजदराने कर्ज

·         नोकरीत समान संधी, प्रसुती रजा

·         कृषिबाबत युवतींना प्रशिक्षण व योजनांमध्ये युवती लाभार्थी

आर्थिक-

·         युवतींना मालमत्तेत समान हक्क

·         जेंडर बजेटींग व जेंडर ऑडिटींग

·         शासनाच्या सर्व योजनांत 50 % युवती लाभार्थी

सामाजिक-

·         स्वच्छ पुरेशी स्वच्छतागृहे

·         विवाहपुर्व समुपदेशन (कौन्सेलिंग)

·         हुंडाप्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी

सत्तासहभाग-  

·         निवडून येणाऱ्या निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या युवतींना प्रशिक्षण

·         युवक मंडळे क्रिडा मंडळे यांत युवतींचा सहभाग

·         विविध निर्णय प्रक्रीयेत युवतींचा समावेश

 

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची वाटचालः- युवतींच्या अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यास पक्षाने सुरुवात केलेली आहे. युवती स्वतः पुढे येऊन गावागावांत आपले संगठन बांधत आहेत.महिलांच्या सुरक्षेसंबंधी अनेक पोलिस स्टेशन्स व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटी देऊन युवतींचे प्रश्न त्यांनी समोर आणले आहेत. महिला शौचालयांचा प्रश्न हाती घेऊन रेल्वे स्टेशन्स, एस.टी. स्टॅन्ड येथे भेटी देऊन शौचालयांची स्थिती सुधारावी म्हणून युवती प्रयत्नशील आहेत. युवतींच्या शिक्षणासंबंधीच्या अनेक मागण्या संघटनेतर्फे लावून धरल्या आहेत. नुकतेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवतींसाठी वसतीगृह स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

 

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस

१२ कलमी कार्यक्रम

१.  उच्च शिक्षणाच्या सोयीसुविधा, सहाय्य आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

२.  स्त्री भृणहत्या विरोधी जनजागरण मोहीम

३.  हुंडाबंदीचा अंमल व साधे –सामुदायिक विवाहांचे आयोजन

४.  छेडछाड मुक्ती व सुरक्षितता अभियान

५.  कौटुंबिक हिंसाचार मुक्त समाज

६.  व्यसनमुक्ती मोहीम व गुटखाबंदी अंमलबजावणी

७.  स्वतच/मुबलक व मोफत सार्वजनिक शौचालये

८.  सुरक्षित ,वेळेवर व सुखकर एस.टी. तथा सिटी बस प्रवास 

९.  खेळ व क्रीडांगणाच्या संधी व सुविधा

१०. बहुपयोगी समुपदेशन अभियान

११. राष्ट्रवादी युवती अभिसरण

   १२. राष्ट्रवादी युवती मंच उभारणी