NEWS

श्रीमती. सुप्रिया सदानंद सुळे

श्रीमती. सुप्रिया सदानंद सुळे ( खासदार )
जन्म: ३० जून १९६९
शिक्षण: बी.एस.सी (मायक्रोबायोलॉजी)

 

परिचय: सौ.प्रतिभा आणि श्री.शरदचंद्र पवार यांच्या पोटी दि.३० जून १९६९ रोजी पुणे येथे जन्म. सदानंद सुळे यांच्याशी विवाहबद्ध. रेवती आणि विजय या दोन मुलांच्या माता. सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळत समाजकार्याला सुरुवात. यथावकाश सक्रीय राजकारणात सहभाग. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून कार्यरत . सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही लौकिक. चित्रकला, साहित्य, विज्ञान यासह इतरही अनेकविध सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये विशेष रुची.

 

सामाजिक कार्यातील सक्रीय सहभाग:

 • स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यव्यापी अभियान.
 • महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण घडवून आणण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार.
 • महिला बचत गटांच्या प्रशिक्षणासाठी आणि त्यांना बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांच्या सक्षमिकरणासाठी राज्यव्यापी काम.
 • महिला सुरक्षेसाठी कायम आग्रही.
 • गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांना मिळावे याकरीता विविध मार्गांनी प्रयत्नशील.
 • अपंग व्यक्तींच्या हक्कासाठी कार्यरत. अपंग धोरणाचा मसुदा राज्य शासनाकडे सादर .
 • ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी प्रयत्नशील, ज्येष्ठ नागरिक धोरणासाठी पाठपुरावा.
 • शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी कटीबद्ध .

राजकीय कारकिर्द :-

 • राज्यसभेवर ११ सप्टेंबर २००६ रोजी महाराष्ट्रातून बिनविरोध निवड.
 • १५ व्या लोकसभेमध्ये (२००९ सालच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये) बारामतील लोकसभा मतदरासंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी.
 • १६ व्या लोकसभेमध्ये (२०१४ सालच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये) बारासमती लोकसभा मतदारसंघातून विजयी
 

तरुण खासदारांची कुपोषणावर काम करणाऱ्या Citizens Alliance against Malnutrition च्या सदस्या.

 

कार्यकारी अध्यक्ष :

 • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
 

विश्वस्त:-

 • नेहरू सेंटर, मुंबई
 • नॅशनल असोसिएशन फॉक द ब्लाईंड (NAB)
 • विद्या प्रतिष्ठान, बारामती
 • पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट
 

संकेतस्थळ :-