NEWS

तालुक्यांतील विकास कामे

बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे संपूर्ण देशामध्ये एक आदर्श लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गेल्या चार दशकापासून या मतदारसंघाची धुरा आदरणीय पवार साहेबांनी समर्थपणे सांभाळली आहे. पंतप्रधान श्री.मनमोहनसिंग यांनी या भागाचा विकास बघून हा बारामती पॅटर्न अगदी वाखाणण्याजोगा असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत. 2009 साली खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सुप्रियाताई विकासाच्या याच वाटेवर पुढे जात आहेत.

 

महाराष्ट्र शासनाकडे मतदारसंघाच्या विकासाच्या अनेक कामांसाठी मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका आणि पाठपुरावा करीत आहेत. केंद्रात देखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ मतदारसंघाला कसा होईल आणि जास्तीत जास्त निधि मतदारसंघातील गावांना आणि शहरांना कसा मिळेल यासाठी खासदार म्हणून त्या सतत प्रयत्नशील असतात. या कामामध्ये त्यांना उल्लेखनीय यश देखील आले आहे. पुणे महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर ताईंचे बारीक लक्ष असते व लोकप्रतिनिधी म्हणून या संस्थांच्या त्या सतत संपर्कात असतात. त्यांच्या याच सातत्यपूर्ण कामाचा परिणाम म्हणून मतदार संघामध्ये 2,500 कोटींची विकास पूर्ण झाली आहेत आणि प्रगतीपथावर आहेत.

 

खासदार म्हणून काम करतांना आपल्या मतदारसंघातील सामान्य जनतेमुळेच ही संधी आपल्याला मिळाली आहे याची जाणिव सतत ठेवली आहे. आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ देणाऱ्या आणि गावागावांमध्ये लोकांना भेटी देणाऱ्या खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख बनवली आहे. जनतेसोबतच्या याच संपर्कातून मतदारसंघातील विकासकामांची गरज लोकांच्या समस्या याची जाणीव सुप्रियाताईंना सतत होत असते.

 

प्रगतीचे मार्ग

 • गावे आणि खेडी मुख्य रस्त्यांना आणि तालुक्यांना जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून 156.72 कोटी रुपयांची कामे.
 • सीआरएफ (सेंट्रल रोड फंड) च्या माध्यमातून 84 किलोमिटर रसत्यांची कामे.
 • कादवे घाटामधील रस्त्याच्या कामांमुळे हा घाट प्रवासासाठी अधिक सुरक्षित झाला आहे.
 • विशेष बाब म्हणून मुळशी तालुक्यातील धरण भागातील 10 दुर्गम गावे पहिल्यांदाच रस्त्यांनी जोडली गेली.
 • पुणे-बंगलोर महामार्ग व पुणे-सोलापूर महामार्गांचा विकास आणि यांचा फायदा गावांना व्हावा म्हणून योग्य ठिकाणी अंडरपास, फ्लायओव्हर, रोडक्रॉसिंग.
 • धायरी आणि धनकवडी उड्डाणपुलास मंजूरी आणि निधीची तरतूद मिळवली. उड्डाणपूलांचे काम प्रगतीपथावर
 • दौंड-सिद्धटेक आणि दौंड पाटस रस्त्याचे काम पूर्ण
 • सासवड- काळदरी रस्त्यामुळे 40 किलोमिटरचे अंतर 20 किलोमिटरवर.
 • जिथे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आणि किल्ल्यावरच्या शेडसाठी विशेष बाब म्हणून निधी मंजूर.  

 दिशा प्रकाशाच्या        

 • पायाभूत आराखडा, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना आणि डीपीडीसीच्या माध्यमातून विजेची अनेक गावांतस्विचिंग,नवीन रोहित्रांची संख्या आणि क्षमता वाढवणं, नवीन वाड्यांचं विद्युतीकरण अशा वेगवेगळ्या कामाकरीता रुपये २३०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
 • 18 सबस्टेशनचे काम पूर्ण होऊन उचित दाबाच्या विजेचा सुरळीत पुरवठा सुरू. नवीन 24 सबस्टेशनला मान्यता मिळऊन देउन काम प्रगतीपथावर.
 • सात सबस्टेशनची क्षमता वाढवण्यात आली.
 • मुळशी तालुक्यातील मोसे खोरे, वेल्ह्यातील पाबे इथल्या दुर्गम भागांमध्ये पहिल्यांदाच विशेष बाब म्हणून वीज पोहोचवली आहे.

पाण्याने फुलली हिरवाई

 • पुरंदर उपसा योजनेचा तीसरा पंप कार्यान्वीत, योजनेसाठी 21 तास विद्युतपुरवठा, 300 हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचा लाभ होऊन पुरंदर आणि दौंडमधील शेतकऱ्यांचे बारमाही बागायती शेतीचे स्वप्न पूर्णत्वाकडे
 • जनाई शिरसाई योजने तीसरा टप्पा पूर्ण करून बारामती आणि दौंड मधील शेतीस मुबलक पाण्याची उपलब्धता
 • नाझरे जलाषयातील गाळाचा उपसा झाल्याने कऱ्हा नदी पुन्हा खळाळून वाहू लागली आणि 788 दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण पूर्ण भरले.
 • शिरपूर पॅटर्न राबवून नाला खोलीकरण, सलग समतल चर, विहीर पुनर्भरण, बंधारे दुरुस्ती, ओढा सरळीकरण आणि खोलीकरण, गाळ काढणे यासारखी कामे वेगाने झाली.
 • नाझरेच्या जलाशयातील गाळाचा उपसा करण्यासाठी १ कोटीचे काम पूर्ण झाल्याने तीन वर्षानंतर कऱ्हा नदी खळाळून वाहू लागली. ७८८ दशलक्ष घनफूट क्षमता असलेले धरण पूर्ण भरले आहे.
 • शहरी भागात पाणिपुरवठ्य़ाकरीता कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे या १३ कोटी ९० रुपये निधीच्या प्रादेशिक पाणी योजनेमुळे २० लाख लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत.
 • जलशुद्धीकरण केंद्रांना परवानगी मिळवून देणे आणि प्राधिकरण योजना राबवून अधिकाधिक लोकसंख्येला शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी पुढाकार

शिक्षणाची गंगा आली अंगणी... 

 • मतदारसंघातील 1000 हून अधिक होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ताईंमार्फत दिली जाते.
 • प्राथमिक शाळांसाठी नवीन इमारती तसेच तालुक्यात तंत्रशिक्षणासाठी आयटीआयच्या सुसज्ज इमारती, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक साहित्य, वसतिगृह अशा प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध
 • व्हिजन एज्युकेशन प्रोग्रामच्या माध्यमातून दरवर्षी ३०० हून अधिक शाळांतील १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत करीयरच्या नवीन संधी, समुपदेशन या माध्यमातून मार्गदर्शन
 • मतदारसंघातील २० शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी यासाठी सुप्रियाताई  वैयक्तिक लक्ष देत आहेत. या शाळांमध्ये दुर्गम अशा भुतोंडे भागातील ९ शाळांचा समावेश आहे.

 आरोग्यसेवा आपल्या दारी.. 

 • पुरंदरमधील १२८ गावांत हेल्थबस दररोज लोकांना आरोग्य सुविधा पुरवीत आहे.
 • मतदारसंघात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी, दवाखान्याच्या सुसज्ज इमारतींची उभारणी

एस.टी आपल्या गावात....

 • दौंड-नानवीज, भोर-केळवडे अशा नवीन मार्गावर एस.टी सुरु करण्यात यश.
 • ज्याठिकाणी एस.टी पोहचू शकत नाही अशा भागात वेल्हा ते नसरापूर, वेल्हा ते पानशेत अशा मिनीबसेस सुरु.
 • भोर एस.टी स्थानक नूतनीकरण
 • वेल्हा तालुक्यात नविन बस स्थानकांस मंजुरी

 

तालुक्यांतील कामांकरीता

खालील नावांवर क्लिक करा

 

 

इंदापूर

 

 

बारामती

 

 

पुरंदर

 

 

दौंड

 

खडकवासला

 

 

भोर

 

वेल्हा

 

 

हवेली

 

मुळशी