NEWS

कार्यअहवाल - लोकसंवाद

(कार्यअहवाल डाऊनलोड करण्याकरीता खालील मुखपृष्ठावर क्लिक करा )

 

मागिल निवडणुकीत आपण दिलेल्या विक्रमी मताधिक्यामुळे मी १६ लाख मतदारांची प्रतिनिधी म्हणून सन्मानाने देशाच्या सर्वोच्च सभागृहात सदस्य म्हणून काम करू शकले. मतदार संघातील विविध विकास कामे आणि जनतेसमोरील प्रश्न यांच्या माध्यमातून आपण सतत संपर्कात असतोच. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवार म्हणून पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधताना मला आनंद होत आहे.

 

आपल्या अविरत प्रयत्नांनी आदरणीय पवार साहेबांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची ओळख संपूर्ण देशामध्ये आणि विदेशात देखील विकासाचे मॉडेल म्हणून करून दिली आहे. मा. अजितदादा पवार यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या विभागाला आधुनिक रुप दिलं.  लोकप्रतिनिधी आणि राजकीयसामाजिक कार्यकर्ता कसा असावा याबाबत आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवून दिलेल्या मार्गावर तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने चालण्याचा माझा प्रयत्न आहे. 

 

केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका, विविध पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांच विकास कामे या काळात मला मतदारसंघामध्ये करता आली. या निधीतून शेती, पाणी, रस्ते, वीज या संबंधीची अनेक कामे आपल्या विभागविकासकामे करता आली. शिक्षण, आरोग्य, युवकांचे प्रश्नआणि शा विविध क्षेत्रात नवनव्या गोष्टी करता आल्या. हे काम करीत असताना आदरणीय पवार साहेबांच्या धोरणानुसार राजकारणासोबत समाजकारणावर देखील भरदिला आहे. यामुळेच मला महिला बचतगटअपंग, ,पर्यावरण तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही भरीव काम करण्याची संधी मिळाली.

 

शेती म्हणजे आपल्या समाजाच्या विकासाचा पाया. आपल्या मतदारसंघातील शेतीच्या पाण्याची गरज  लक्षात घेऊन पुरंदर उपसा योजना, जनाई-शिरसाई योजना तसेच जलसंधारणासाठी विविध उपक्रमांद्वारे आपल्या मतदारसंघातील खूप मोठ्या भागाला पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतमाल प्रक्रीया दुग्ध उत्पादन आणि शेतीपूरक व्यवसायात आपण चांगलीच आघाडी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील आपला सहभाग ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

 

प्रत्येक गावाला योग्य दाबाचा वीजपुरवठा म्हणजे विकासाचा मापदंड. याच विचाराने विजेची कामे सुरु झाली. मतदारसंघाच्या भोर-वेल्हा-मुळशी या भागातील अनेक गावांमध्ये वीज पोहचली नव्हती त्या ठिकाणी विषेश बाब म्हणून वीजपुरवठा सुरु झाला आहे. आपल्या गावात- आपल्या घरात वीज आली म्हणता गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला कधीही विसरता येणार नाही. विजेचे सबस्टेशन वाढवल्याने अनेक गावांमध्ये आज योग्य दाबाची वीज उपलब्ध होत आहे.

 

रस्ते म्हणजे आपल्या गावाला विकासाशी जोडणारा दूवा... केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांमधून आपल्या विभागात नवनवीन रस्ते तयार झाले आहेत. रस्त्यांना नियमित देखभाल व सतत डागडूजीची गरज असते. हेच लक्षात घेऊन अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे झाली आहेत. शहरी भागात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी धनकवडी, वारजे आणि धायरीचे उड्डाणपूल आकार घेत आहेत.  दौंड-पुणे रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाचे काम देखील जोरात सुरू आहे.

 

माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरवात शैक्षणिक आणि मुलांसोबतच्या सामाजिक कार्यातून झाली. त्यातूनच एकूण समाजातील शिक्षणाचे  महत्व मला पटत गेले. खासदार म्हणून मुलांना आपल्या करीयर विषयी मार्गदर्शन मिळावे, शाळा आणि आयटीआयच्या सुसज्ज इमारती आणि वसतिगृह असावेत यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिले आहे.

 

पुण्यासारख्या महानगराच्या शेजारी असेला आपला मतदारसंघ.पुण्याच्या विकासाचा जसा आपल्याला लाभ होतो आहे, तसाच शहराचा करचऱ्याचा त्रास देखील आपल्या विभागातल्या फुरसुंगीला होत आहे. हा त्रास कमी व्हावा म्हणून कचरा डेपोवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून त्रास कमी व्हावा तसेच शहरातील कमीत कमी कचरा डम्पिंग ग्राउंडवर यावा या प्रयत्नांना लोकांच्या साथीने यश येत आहे.

 

गेली पाच वर्षांतील कामाचे खरा श्रेय जर कोणाचे असेल तर ते तुम्हा सर्वांचे आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर कामाची सुरुवात कशी करावी हे जसे मला आदरणीय पवार साहेब आणि माननीय अजितदादांनी शिकवले तसेच माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेने आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील शिकवले. आपुलकीने भेटणारे लोक आणि त्यांनी आणलेली समाजहिताची कामे हेच माझे राजकारणाचे शिक्षण आहे.

 

पुढील काळात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याची अविरत उपलब्धता हेच आल्यापुढील ध्येय राहणार आहे. कमी पावसात देखील आपला पाणि पुरवठा कायम रहावा याकरीता जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात घेण्याचा माझा मानस आहे. पायाभूत सुविधांसोबतच आपल्या विभागातील शाळा व महाविद्यालयांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळून युवांना रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर आपल्या भागामध्ये नविन आणि मोठे उद्योगधंदे स्थापन होऊन ग्रामिण तसेच शहरी विकासाचा मापदंड आपला विभाग घालून देईल. विविध शासकीय कार्यालये तसेच माझ्या कार्यालयामध्ये देखील लोकांच्या प्रश्नांची लवकर सोडवणूक व्हावी याकरीता व्यवस्थापकीय बदल अपेक्षित आहेत. मी जनसंपर्काकरीता इ-मेल, फेसबूक सोबतच टेलिफोन हेल्पलाईन सुद्धा सुरु करणार आहे.

 

आपल्या महान देशाच्या सन्माननीय सभागृहामध्ये मला काम करण्याची संधी आपल्यामुळेच मिळाली आहे. मतदारसंघा एखाद्या वाडी/ वस्तीतील शेतकरी बांधवापासून अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंतच्या भेटींनी मला भरपरूर शिकवले आहे. यादरम्यान मी काही करू शकले ही मला समाधान देण्याची गोष्ट आहे. अजून अनेक विषयांवर काम करायचे आहे याची पण मला जाणीव आहे. एक प्रगत मतदारसंघ म्हणून असलेली बारामती मतदारसंघाची देशातील ओळख कायम रहावी आणि पुढील विकासाचा हा आलेख आसाच उंचावत नेण्याची माझी इच्छा आहे.