NEWS

जनाई शिरसाई...

 

जनाई-शिरसाई पाणी योजना- जनाई-शिरसाई योजनेचा सध्या तिसरा टप्पा सुरु आहे. योजनेत येणाऱ्या अडी-अडचणी जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) यांच्या सोबत सातत्याने मुंबई येथे बैठका घेऊन सोडविण्यास प्राधान्य दिल्याने आता ही योजना वेगाने प्रगतीपथावर आहे. याचा तिसरा टप्पा कार्यान्वित झाल्याने पुरंदर आणि बारामती तालुक्यातील २८५० हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.

 

मयुरेश्वर वनपरिक्षेत्र हे वन्यजिव अभयारण्य म्हणून घोषित झाल्यामुळे या योजनेच्या कामात अडथळे आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यासाठी भरपूर विजेची गरज असल्यामुळे योजनेचे विजबील देखील थकले होते.

 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी संजिवनी योजनेअंतर्गत रू. 1910 लक्ष एवढ्या व्याजाच्या रकमेत सुट मिळाली. उर्वरीत देयकाचची रक्कम रु. 1192 लक्ष इतकी प्रकल्पाच्या मंजूर अनुदानातून अदा करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे काम आता पुन्हा सुरु झाले आहे.

 

            

 

शिरसाई योजनेअंतर्गत 4 कालवे असून, सदर कालव्यांच्या एकूण 53 कि.मी. प्रस्तावीत लांबीपैकी 52 कि.मी. लांबीचे काम पूर्ण झाले आहे. शिरसाई डावा व उजवा कालवा, शिर्सुफळ उजव्या कालव्यावरील वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण झाली आहेत. शिर्सुफळ डाव्या कालव्यावरील वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण झाली आहेत.

 

 

 

दि.१५ नोव्हेंबर 2013 रोजी वढाणे, बारामती इथे जनाई उपसा सिंचन योजनेचा उद्घाटन समारंभ आदरणीय साहेब, माननीय दादांच्या उपस्थितीत पार पडला.. त्यावेळी बोलतांना आदरणीय पवार साहेबांनी ही योजना दुष्काळग्रस्त भागासाठी आहे, तरी भविष्यातपाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन शेतकऱ्यांना केले.