NEWS

सक्षम लोकप्रतिनिधी (१५ व्या लोकसभेतील कामगिरी )

 

आज महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात सुप्रिया सुळे यांच्याकडे एक आश्वासक नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. लोकसभेमध्ये देखील त्या एक अभ्यासू खासदार म्हणून परिचित आहेत.

 

संसद रत्न पुरस्कार (२००९-२०१४).

·         लोकसभेतील त्याच्या कार्यामुळेच महिलांसाठीच्या संसदरत्न पुरस्काराठी त्यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे.

 

 

उपस्थिती

चर्चांमधील सहभाग

विचारलेले प्रश्न

खाजगी विधेयके

खा. सुप्रिया सुळे

८६ टक्के

३७

७२९

देशातील एकूण खासदारांची सरासरी

७६ टक्के

३६.८

२९२

०.८

महाराष्ट्रातील खासदारांची सरासरी

७४ टक्के

२८.३

४८७

१.७

 

सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यांत सक्तीचे मतदान, लोकसंख्या नियंत्रण, मुलींचे शिक्षण यांचा अंतर्भाव आहे.

आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, पोलिओ निर्मूलन यासारख्या ३७ महत्वाच्या चर्चेत त्यांनी लोकांची बाजू मांडली आहे.

भ्रष्टाचार मुक्त राष्ट्रासाठी आणि सक्षम लोकशाहीसाठी खा. सुप्रियाताई सुळेंनी लोकपालची गरज मांडली. महिलांच्या व युवतींच्या सुरक्षेबाबत फौजदारी कायद्यांमध्ये सुधारणा करून बलात्कारासारख्या गुन्ह्यांना फाशीची शिक्षा देणे तसेच छेडछाडीच्या विरोधी कठोर कायदे करण्यासाठी संसदेमध्ये दबावगट निर्माण करून संसदेतील चर्चेदरम्यान आपली बाजू कणखरपणे मांडली.

महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांची तड लावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर त्या सतत कार्यरत असतात.

गेली चार वर्षे त्या रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेत आहेत. रेल्वे अपघात आणि सुरक्षा, प्रवाशांना योग्य सुविधा तसेच हमालांच्या प्रश्नांबाबत त्या नेहमी आग्रही राहिल्या आहेत. गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात मतदारसंघ व एकूणच महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद व्हावी याकरीता महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसोबत त्यांनी माननीय पंतप्रधानांची भेट देखील घेतली होती.

संसदीय समित्या

ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि तंत्रज्ञान तसेच ग्रंथालय या संसदेच्या समित्यांमध्ये त्या सक्रीय आहेत.