NEWS

पर्यावरण

 

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वसुंधरा पर्यावरण संवर्धन अभियान तर्फे सन २०११-२०१४ या शैक्षणिक वर्षामध्ये शाळामध्ये हवामान बदल विषयक शिक्षण व कृती प्रकल्प राबविण्यात आला.  मुंबईतील ३० शाळांमधील जवळजवळ ३००० विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी झाले होते.


हवामान बदल ही संपूर्ण जगाला ग्रासून टाकणारी एक पर्यावरणीय समस्या आहे.  एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच तिचे दुष्परिणाम भारतात सुद्धा दिसू लागले आहेत.  हवामान बदलामुळे समुद्रकिनाऱ्यावरील जीवन धोक्यात येत आहे.  चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे.  पिकांच्या प्रजाती कमजोर पडत आहेत.  पाण्याच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होत आहे.  जैवविविधतेचा ठेवा नष्ट होत आहे.


म्हणूनच यावरील उपाययोजना गावापासून शहरापर्यंत आणि कारखान्यापासून शाळांपर्यंत सर्वत्र अमलात येणे अपेक्षित आहे.  ही व्यापक संकल्पना घेऊन सन २०११-१२, सन २०१२-१४ आणि सन २०१३-१४ या तीन वर्षात प्रत्येक वर्षी मुंबईतील दहा शाळा याप्रमाणे ३० शाळामध्ये दर महिन्याला एक शिक्षण व कृती उपक्रम याप्रमाणे प्रकल्प राबवले गेले.


विविध सत्रे ह्या पर्यावरणविषयी कार्यक्रमात घेण्यात आली:

हवामान बदल व जागतिक तापमानवाढ

जलसंवर्धन

वृक्षरोपण

कचरा व्यव्स्थापन

स्थनिक जैवविविधता


उपक्रमांतर्गत दहा शाळांपैकी ३ सर्वोत्कृष्ट शाळांची निवड करण्यात आली.


केवळ शिकवण्यापुरताच हा प्रकल्प मर्यादित न राहता विद्यार्थ्यानी गच्चीवर बागा फुलवल्या व जैविक शेती केली. या पासून प्रेरणा घेवून मुंबईतील सर्वच शाळांनी या कृतीमधून बोध घेतला आणि असे कृती प्रकल्प हाती घेतले तर मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या पर्यावरणाचे संवर्धन होईल. हवामान बदलाच्या समस्येला आळा घालण्यासाठी असे उपक्रम नक्कीच पथदर्शी ठरू शकतील असा विश्वास वाटतो