NEWS

शैक्षणिक गुणवत्ता

प्रस्तावना-

पैसे, आरोग्य आणि शिक्षण या आजच्या काळाच्या महत्त्वाच्या गरजा बनल्या आहेत. मानवी विकासासाठी तर शिक्षण ही जणू अटच बनली आहे. मी असं मानते, की प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बलकाचा मूलभूत हक्क आहे.

खरंतर प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र इतर बऱ्याच राज्यांच्या तुलनेत खूपच पुढारलेला आहे. राज्यात जवळपास ८४,००० प्राथमिक शाळा आहेत आणि त्यात अध्यापनासाठी ४.५ लाख शिक्षक आहेत. शिक्षक-विद्यार्थ्यांचे हे गुणोत्तर समाधानकारक आहे. तरीही शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अजून पुष्कळ काही करण्याची गरज आहे. केरळ, छत्तीसगड, दिल्ली आणि हिमाचलप्रदेशने या बाबतीत महाराष्ट्राला मागे टाकले आहे.

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरीता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि काही शैक्षणिक संस्थांच्या मदतीने आपण शैक्षणिक कार्यक्रम आखला आहे. यापक्रमांचा समावेश आहे

 

प्राथमिक शिक्षणातील अडचणी:-

  • १०,००० शाळांना व्यवस्थित इमारती आणि पायाभूत सुविधांची गरज आहे.
  • विद्यार्थी गळतीचे प्रमाण (प्राथमिक शिक्षणातील १२.६६% आणि माध्यमिक शिक्षणातील २९%) कमी करण्याची गरज आहे.
  • NCERT, गुड अर्थ यांसारख्या शैक्षणिक संशोधन केंद्रांनी महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये आकलन क्षमता, सोपी गणिते सोडवणे यांसारख्या मूलभूत कौशल्यांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या एका अहवालात नमूद केलेले आहे.
  • डी.एड् कॉलेजेची संख्या, कार्यावलोकनाचा अभाव, शैक्षणिक संस्थांमधील भ्रष्टाचार आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांमध्ये असलेला स्वयंपूर्णतेचा अभाव याही यासंदर्भातील काही महत्त्वाच्या अडचणी आहेत.
 
 

आपला शैक्षणिक कार्यक्रम:-

• महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरीता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि काही शैक्षणिक संस्थांच्या मदतीने आपण शैक्षणिक कार्यक्रम आखला आहे.

यापक्रमांचा समावेश आहे.-

सर्वांगीण शिक्षण गुणवत्ता अभियान(SSGA)

• यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे २७ एप्रिल, २००५ रोजी सर्वांगीण शिक्षण गुणवत्ता अभियान मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रिय कृषीमंत्री मा.शरदचंद्र पवार, तद्कालीन मुख्यमंत्री मा.विलासराव देशमुख, तद्कालीन उपमुख्यमंत्री मा.आर्.आर्.पाटील, तद्कालीन शिक्षणमंत्री मा.वसंत पुरके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

• त्यानंतर प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याविषयीचे ४५ पानी शासकीय परिपत्रक राज्य शासनाने जाहीर केले. या परिपत्रकानुसार प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यात शिक्षक-गटांचा सहभाग अपेक्षित आहे.

प्राथमिक शिक्षण परिषद:-

१८ जून २००६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला गीता महाशब्दे, हेरंब कुलकर्णी, हर्षवर्धन सपकाळ, इरगोंडा पाटील, शुभदा चौकर, रमेश पानसे, सिमंतिनी धुरू इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीचा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण सचिवांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

आढावा बैठक:-

महाराष्ट्र शासनाचे शिक्षण सचिवे श्री.लुमीत मलिक यांच्यासोबत मंत्रायलायात आमची एक बैठक झाली. या बैठकीत आम्ही प्राथमिक शिक्षणाच्या या प्रश्नाविषयी चर्चा केली.

या बैठकीचा अहवालही सदर मंत्र्यांकडे सादर करण्यात आला.

अमरावतीतील शिबीर:-

ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांच्या सबलीकरणावर चर्चा करण्यासाठी १० ऑक्टोबर २००६ रोजी अमरामवती येथे एक-दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिक्षण संचालक श्री.विजय देवसकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबीरात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील १४ शिक्षण संस्था सहभागी झाल्या.

एक-दिवसीय शिक्षण परिषद:-

११ एप्रिल २००७ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे एक-दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. श्री.श्रीकर परदेशी, श्री.निपुण विनायक, श्री.चंद्रकांत दळवी, श्री.प्रभाकर देशमुख इ. शासकीय अधिकाऱ्यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांवर सादरीकरण केले.

राज्यस्तरीय प्राथमिक शिक्षण परिषद:-

११ सप्टेंबर २००८ रोजी राज्यस्तरीय प्राथमिक शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास, या विकासात शिक्षकांची व पालकांची भूमिका, एस्.एस्.सी पुढील समस्या इ विषयांवर या परिषदेत चर्चा झाली.