NEWS

रस्ते सुरक्षा, रस्ते अपघात, अपघात नियंत्रण आणि रोक

उद्दिष्ट :- रस्ते अपघातांचे आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करणे आणि अपघातमुक्त राज्य घडवणे

 

भारतभरात राज्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची लांबी-
३३,२०,४१० कि.मी
द्रुतगती मार्ग २०० कि.मी. एकूण रस्ते लांबीच्या २.२५%
राष्ट्रीय महामार्ग ७०,५४८ कि.मी.  
राज्य महामार्ग १,३१,८९९ कि.मी.  
महत्त्वाचे जिल्हा रस्ते ४,६७,७६३ कि.मी. एकूण रस्ते लांबीच्या ९७.७५%
ग्रामीण आणि इतर रस्ते २६,५०,००० कि.मी.  
 

अपघाती मृत्यूंच्या प्रमाणाच्या अभ्यासानुसार :-
३५% मृत्यू राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांमुळे होतात.+ ३२% मृत्यू राज्य महामार्ग व जिल्हा रस्त्यांवर होतात. + ३३% अपघात इतर रस्त्यांवर होतात.

दर १०० कि.मी.ला मृत्यूंचे प्रमाण :-
राष्ट्रीय २% लांबी ३०५ मृत्यू
राज्य ७% लांबी १२० मृत्यू

 

गेल्या ५० वर्षांत देशातली वाहनसंख्या १११ पट वाढली आहे, तसेच प्रवासी आणि माल वाहतूक १२५ पट वाढली आहे. मात्र रस्त्यांची लांबी फक्त दुपटीने वाढलीये. देशभरातील एकूण रस्ते अपघातांत एक लाख अडतीस हजार जणांचे मृत्यू झालेले आहे तर एक लाख पंच्याण्णव हजार जणांना अपंगत्व आलेले आहे.

तज्ज्ञांच्या मते भारतात मिनिटागणिक किमान एक गंभीर इजा करणारा अपघात होतो, तर दर पाच मिनिटांना एक अपघाती मृत्यू.

१८ ते ५० वर्षे वयोगटातील प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण ३६% आहे, ज्यायोगे देशाची ६६% उत्पादक वयोगट कमी होतो.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील मृत्यूचे प्रमाण

 
क्रमांक देश मृत्यूचे प्रमाण %
मालवी २१.५
भारत १९.३४
झाम्बिया १४.२९
पोलंड ८.७९
दक्षिण आफ्रिका ७.२१
झिम्बाब्वे ६.२५
फ्रांस ४.५
स्पेन ४.०१
स्वीडन २.४८
१० ऑस्ट्रिया २.०५
११ जर्मनी १.६८
१२ युनायटेड किंग्डम १.११
१३ जपान ०.९९५

रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात भारताचा क्रमांक दुसरा आहे. अहवालानुसार, दरवर्षी देशात अपघातांमुळे सुमारे ७५.००० कोटी रुपयांचे नुकसान होते, जे ३% स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाइतके आहे.

देशातल्या रस्ते अपघातांच्या प्रमाणांचा सखोल अभ्यास केल्यावर लक्षात येते, की महाराष्ट्र अपघातप्रवण राज्यांमध्ये वरच्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ ३.०८ लक्ष चौरस कि.मी. आहे. तर लोकसंख्या ११.५ कोटींपेक्षा जास्त आहे. राज्यात ४५०० कि.मी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत आणि २.४ लाख कि.मी लांबीचे ३४,००० राज्य महामार्ग आहेत.

राष्ट्रीय महामार्ग- ४३७६ कि.मी.
राज्य महामार्ग- ३४,१०२ कि.मी.
जिल्हा महामार्ग- ४९९०१ कि.मी.
इतर जिल्हा महामार्ग- ४३,८१७ कि.मी.
ग्रामीण रस्ते- १.०४.८४४ कि.मी.

 

भारतात दर एक हजार वाहनांमागे रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी १.६ आहे. तर महाराष्ट्रात ती १.४ टक्के इतकी आहे. सामाजिक सुरक्षेच्यादृष्टीने ही निश्चितच गंभीर बाब आहे.

रस्ते अपघातांची कारणमीमांसा करताना जबाबदार घटक आणि त्यांचे प्रमाण खालीलप्रमाणे असल्याचे निदर्शनास आले :-
अ) चालकांचे दुर्लक्ष- ८३.००%
आ) पादचाऱ्यांमुळे- ०६.००%
इ) रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे- ०४.६०%
ई) वाहनांमधील तांत्रिक बिघाड- ०३.६०%
उ) खराब हवामान- ०२.८०%

 

अभ्यासावरून असे निदर्शनास आले आहे की, २००० ते २०१० या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रातील रस्ते अपघातांच्या प्रमाणात तीव्र वाढ झालेली आहे.

राज्यातील एकूण रस्ते अपघातांपैकी ३०% अपघातांना महानगरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये वास्तव्याला असलेली, एकूण लोकसंख्येच्या ६% जनता जबाबदार आहे. त्यापैकी ७५% अपघात मनुष्य-अनावधानाने होतात, जे टाळता येऊ शकतील.

जानेवारी ते नोव्हेंबर २०१० या ११ महिन्यांच्या उपलब्ध आकडेवारीवरून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की,

या काळात राज्यभरात झालेल्या एकूण ६२,९५३ अपघातांपैकी ३२,४२६ अपघात शहरी परिसरात झाले आहेत