NEWS

युवा विकास

अभिसरण -

खऱ्या महाराष्ट्राशी युवांचे नाते जोडणारा उपक्रम
युवा अभिसरण हा राज्यांतर्गत सांकृतिक देवाण-घेवाण कार्यक्रम आहे.महाराष्ट्राबद्दल युवांच्या मनात आत्मियता निर्माण व्हावी याकरीता आधी संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी प्रत्यक्ष पाहण्याची आवश्यकता असते. महाराष्ट्र विविध अंगानी आणि दृष्टीकोनातून समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा अभिमानआणि अस्मिता नक्की काय आहे, हे समजणार नाही. नेमका हा कळीचा मुद्दा लक्षातघेऊन मा.सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवमहाराष्ट्र युवाअभियानाने अभिसरणकार्यक्रमाची आखणी केली. या उपक्रमाअंतर्गत एका विभागातील मुले दुसऱ्या विभागामध्ये ९ दिवस प्रत्यक्ष राहून त्या विभागातील कृषी, लोकांचे जीवनमान, पाण्याची उपलब्धता, उद्योगधंदे, सहकारी संस्था यांना भेटी देतात. या दरम्यान त्या विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेऊन चर्चा देखील करतात. एका वेळी साधारण ६० युवक युवती या उपक्रमामध्ये सहभागी होतात. या मुलांचे नंतर छोटे गट करून ते गावागावांमध्ये जातात. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या युवांच्या राहण्याची व्यवस्था स्थानिक कुटुंबात केली जाते तसेच संपूर्ण नऊ दिवस ही मुले फक्त एस.टी. मधून प्रवास करतात. सहभागी युवकांना संबंधित जिल्ह्याची सर्वांगीण निरीक्षण करता येते. तसेच त्या संबंधी स्थानिकांसह चर्चाही करता येते.

 

युवा स्वातंत्र्यज्योत फेरी-

स्वातंत्र्याची भावना जागवणारा आणि लोकशाहीशी नोते जोडणारी युवांची फेरी

तरुणांमध्ये स्वातंत्र्याबद्दल आदराची भावना निर्माण व्हावी याकरीता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येच्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन करण्यात येते. राज्याच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून नवमहाराष्ट्रयुवा अभियानातर्फे या फेरीचे आयोजन करण्यात येते. रॅलीची सुरुवात स्वातंत्र्यसैनिकाच्या हस्ते मशाल पेटवून रात्री ११ वाजता करण्यात येते. रॅलीची सुरुवात साधारणतः शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून होते. युवक-युवतींच्या वैचारिक स्वतंत्र्याबद्दलआदराची भावना निर्माण करण्याच्या हेतूने या फेरीचे आयोजन करण्यात येते.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत ध्वनिक्षेपके किंवा डी.जेशिवाय हीफेरी काढली जाते. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने काढण्यात येणाऱ्या याफेरीत कोणत्याही धार्मिक घोषणा दिल्या जात नाहीत. शहाराच्या मध्यवर्तीभागापासून ही फेरी काढण्यात येते. भारतीय स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्यावाचनाने व शेवटी राष्ट्रगीताने या फेरीची सांगता होते. भारतीय स्वातंत्र्याच्या सरनाम्याच्या सामूहिक वाचन करून राष्ट्रगीताने रात्री १२ वाजता रॅलीचा समारोप करण्यात येतो. 

 

स्पर्धा -

महाराष्ट्राच्या विकासाचा मागोवा घेणाऱ्या...

युवांची सामाजिक जाणीव वाढावी याकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

·         वक्तृत्व स्पर्धा : राज्यभर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये यशवंतरावांचे कार्य व महाराष्ट्राचा विकास यासंबंधीचे विषय होते. पहिल्या फेरीमध्ये जिल्हा पातळीवर, दुसऱ्या फेरीमध्ये विभागिय पातळीवर व तिसऱ्या फेरीमध्ये राज्यपातळीवर या स्पर्धा घेण्यात आल्या.

·         निबंध स्पर्धाः- यशवंतरावांचे कार्य या वषयावर संपूर्ण राज्यामधून निबंध मागविण्यात आले. आणि उत्कृष्ट निबंधास पारितोषिक देण्यात आले.

·         सुगम गायन स्पर्धाः- पहिल्या फेरीमध्ये जिल्हा पातळीवर, दुसऱ्या फेरीमध्ये विभागीय पातळीवर व तिसऱ्या फेरीमध्ये राज्यपातळीवर या स्पर्धा घेण्यात आल्या.


व्हिजन करियर फेअर-

करीयरच्या वेगवेगळ्या वाटा दाखवणारी जत्रा

आज युवांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे करीयर... अनेक विद्यार्थांना आपल्या करीयर संबंधी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती मिळावी म्हणून व्हिजन करियर फेअरचे आयोजन केले जाते. नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या मार्गदर्शक मा.सुप्रिया सुळे यांच्यापुढाकाराने या करिअरविषयक कार्यक्रमाचे वव्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. १०वी-१२वी नंतर करिअरच्या विविधपर्यायांची ग्रामीण भागातील युवकांना माहिती मिळावी, या मुख्य उद्देशानेव्हिजन करिअर फेअर राबवण्यात येतो. उच्च शिक्षणातील विविध संधी, करिअरसंबंधी पाल्य व पालकांमध्ये सुसंवाद निर्माण करणे, अपयशामुळे येणाऱ्याताणापासून मुक्ती, परीक्षेत अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्धअसलेल्या करिअरच्या विविध संधी, करिअर मार्गदर्शन व समुपदेशन हे विषय याफेअरदरम्यान हाताळले जातात. या तीन दिवसीय फेअरचे आयोजन राज्याच्या काहीठराविक जिल्ह्यांमध्ये केले जाते. यामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर शैक्षणिक संस्था, विद्यापीठे व करियरशी निगडीत संस्थांचा तसेच भारतीय सैन्यदलातील भूदल, नौदल तसेच वायुदलाचा देखील समावेश असतो

फेअरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेत युवकांनाविविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. व्हिजन करिअर फेअरच्या माध्यमातून आजवरराज्यातील विविध ग्रामीण व निम-शहरी भागातील हजारो युवक-युवतींना करिअर वउच्च शिक्षणाविषयी मार्गदर्शन मिळाले आहे.


यशवंत युवा फेलोशिप -

सामाजिक कार्यात काही करु इच्छिणाऱ्या युवांसाठी
सामाजिक क्षेत्रात रचनात्मक कार्य करणार्‍या युवांना मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ व प्रोत्सादन देण्याच्या उद्देशाने १ मे २०१० पासून यशवंत युवा फेलोशिप देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही फेलोशिप १ वर्षांची असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठावाडा या विविध विभागातील कार्यकर्त्यांना फेलोशिप देण्यात येते. निवडलेल्या फेलोंना ठराविक मासिक मानधन, एकरकमी अनुदान देण्यात येते. फेलोशिपमध्ये नियमित प्रशिक्षण, अभ्यासदौरे, दरमहा अहवाल, आढावा, बैठका यांचा समावेश आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, पाणी, शेती, रोजगार आदी क्षेत्रात ३ वर्षांचा भरीव कार्यानुभव असलेले २५ ते ३५ वयोगटातील पदवीधर या फेलोशिपसाठी पात्र होऊ शकतात. सध्या या फेलोशिप अंतर्गत असणारे युवा हे अपंगत्व प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करणेच सेंद्रिय शेतीसंबंधींच्या प्रयोगांचे आणि अनुभवांचे दृकश्राव्य माध्यमातून चित्रिकरण करणे, वन्यजिव संरक्षणासाठी प्रयत्न, रोजगार हमीची कामे अशा विविध विषयांवर कार्यरत आहेत.

 

युवती महोत्सव -

युवतींच्या विकासाकरीता अभिनव उपक्रम
१३ ते २५ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये शिक्षण, शारीरिक व मानसिक आरोग्य, करिअरच्या संधी या विषयांसंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी नवमहाराष्ट्रयुवा अभियानातर्फे युवती महोत्सव आयोजित करण्यात येतात. युवती महोत्सवांचाकालावधी दोन आठवड्यांचा असतो. महोत्सवांतर्गत युवतींसाठी विविध खेळांचेस्टॅाल्स उभारले जातात. या खेळांच्या माध्यमातूनच युवतींना आरोग्य, लैंगिकशिक्षण, जोडीदाराची निवड, करिअरची निवड, करमणूक याविषयीचे मार्गदर्शन केलेजाते. तसेच विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या, उच्च कामगिरीकेलेल्या महिलांसोबत या युवतींचा संवाद घडवला जातो. तसेच विविध विषयांचेमार्गदर्शन करणारे चित्रपटही महोत्सवात दाखवले जातात. महोत्सवातील सर्वकार्यक्रमांचा गाभा आणि रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे, की जेणेकरूनयुवतींमधील नेतृत्वगुणांचा विकास होईल.

 

लघुपट निर्मिती -

महाराष्ट्राच्या विविधतेचे अनेक पैलू दाखणारे लघुपट

राज्यातील मान्यवर व्यक्तींच्या जीवनकार्याचे संकलन व्हावे व त्यांचे कर्तृत्व राज्यातील युवांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरावे यासाठी कर्तृत्ववान मान्यवरांच्या जीवनकार्यावर लघुपट निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे ज्येष्ठ उर्दू शायर बशर नवाज़ यांच्या जीवनावर आधारित लघुपट निर्मिती करण्यात आलेली आहे. 


समाज कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग-

'समाजासाठी काहीतरी करायचंय' असं म्हणणाऱ्या प्रत्येक युवक-युतीसाठी

समाजात बदल होण्याच्या दृष्टीने आणि युवांमध्ये सामाजिक प्रश्नासंबंधी जागृती होण्यासाठी समाज कार्यकर्ता प्रशिक्षणवर्गाचे आयोजन केले आहे आपण जीवन जगत असताना आपणास वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक , राजकीय , वयक्तिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा काम करत असतात हि संपूर्ण यंत्रणा समजून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाची ओळख , प्रश्नाची ओळख व्हावी होण्यासाठी सदर वर्गाचे आयोजन केले आहे. या मध्ये समाजातील वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात त्यातील तज्ञ मान्यवरांकडून मार्गदर्शन व नंतर प्रश्नोत्तरे असून सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था (NGO) यांना भेटी देवून प्रत्यक्ष काम अनुभवण्याची संधी विध्यार्थ्यांना प्राप्त होते.

 

तंबाखू मुक्ती अभियान -

निरोगी युवा पिढी-सक्षम समाज

तंबाखूमुळे भारतात दरवर्षी १० लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात. दर तीन सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करते. विविध प्रकारे वापरण्यात येणाऱ्या तंबाखूच्या उत्पादनांमुळे आपल्या नविन पिढीपुढे आव्हान उभे राहत आहे. महाराष्ट्रामध्ये गुटख्यावर बंदी घालण्यात आली आहे. शाळा कॉलेजच्या आसपास १०० यार्डाच्या परिसरात एकही तंबाखू विक्रीचे केंद्र असू नये, दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे प्रदर्शन मांडले जाऊ नये अशा अनेक तरतुदी कायद्यांमध्ये आहेत. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच जनजागृतीची गरज आहे. हेच लक्षात घेऊन शाळांमध्ये तंबाखूच्या दुष्परीणामांची माहिती देणे व्यसनात अडकलेल्या व्यक्तीना व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि एकूणच समाजामध्ये जनजागृती करणे असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतात.                                                                                                                       

 

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार -

यांनी युवांसमोर आदर्श ठेवला..
सामाजिक क्षेत्रामध्ये रचनात्मक व क्रीडा क्षेत्रामध्ये लक्षवेधी कामगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील युवक-युवतींना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय युवा दिनी म्हणजेच १२ जानेवारी रोजी केले जाते. एका युवक व युवतीला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय व युवा क्रीडा पुरस्कार दिले जातात. तसेच क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीसाठी यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय विशेष युवा पुरस्काराने एका युवक वा युवतीस सन्मानित केले जाते.


अधिक माहितीसाठी भेट द्या: www.navmaharashtra.org